नळदुर्ग,दि.२३: संपूर्ण आयुष्यभर प्रत्यक्ष कृतीतुन स्वच्छतेचा संदेश देवून समाजातील अंधश्रद्धा व व्यसनाधीनता कमी करण्यासाठी समाजप्रबोधनपर कार्य करणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून आपण मानवी आरोग्याच्या दृष्टीने आपले गाव सुंदर गाव बनविण्यासाठी प्रयत्न करावा असे आवहान रिपाइंचे जिल्हा सचिव तथा पत्रकार एस.के.गायकवाड यांनी काळेगाव ता.तुळजापूर येथे बोलताना केले.
काळेगाव येथिल ग्रामपंचायत कार्यालयात संत गाडगेबाबा महाराज यांच्या 145 व्या जयंती निमित्त त्यांना आभिवादनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी गायकवाड हे प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.
प्रारंभी उपसरपंच आनंदराव विनायक पाटिल,ग्रामसेविका श्रीमती टी.ए. शेख, ग्रा.प.सदस्य विशाल रामचंद्र मुळे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आभिवादन करण्यात आले.
यावेळी पञकार शिवाजी नाईक, जि.प पाणी पुरवठा विभागाचे शाखा आभियंता जी.जी.बिराजदार, नागेश भोवाळ,गोविंद मुळे, अमोल आकोस्कर,शाम काटवटे यासह ग्रामस्थ उपस्थित होते.