तुळजापूर, दि. १६:
राजकारणाच्या माध्यमातून तरुणांना योग्य दिशा मिळाली पाहिजे, त्याचबरोबर सामाजिक आणि आर्थिक विकास होण्यासाठी राजकीय पक्षांनी योजनाबद्ध कार्यक्रम आखला पाहिजे, त्याशिवाय राजकारणावरील लोकांचा विश्वास प्रस्थापित होणार नाही असे उदगार लहुजी शक्ती सेनाचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे यांनी तुळजापुरात काढले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तुळजापूर विधानसभा विभाग अध्यक्ष पदी येथील दत्ता भाऊ कांबळे यांची निवड झाली असून निवडीबद्दल लहुजी शक्ती सेनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भाऊ कांबळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य शिवाजी गायकवाड यांचे हस्ते तुळजापूर येथे शाल,श्रीफळ,फेटा बांधून व पुस्पबुके देऊ सत्कार करण्यात आला.यावेळी
केरबा सुरवसे,राजाभाऊ चैगुले, राजेंद्र झोंबाडे,बालाजी कांबळे व इतर उपस्थित होते.
राजकीय क्षेत्रामध्ये तरुणांना योग्य संधी मिळाल्यास त्यांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा करता येऊ शकते. यासंदर्भात लहुजी शक्ती सेना आपले कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देत असल्याचेही यानिमित्ताने प्रदेशाध्यक्ष कांबळे यांनी सांगितले.