नळदुर्ग ,दि.२७ :
मराठी भाषा दिन व कवि कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी जनतेला आवाहन केल्यानुसार मराठी स्वाक्षरी अभियानात
आपला सहभाग नोंदवावा, त्याप्रमाणे नळदुर्ग शहरात मनसेच्या वतीने आयोजित केलेल्या मराठी स्वाक्षरी स्पर्धेला उत्सर्फुत प्रतिसाद मिळाला आहे.
या आभियानात विशेष म्हणजे सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिका-यानी आपला सहभाग नोंदवला आहे. त्याचबरोबर पत्रकार, व्यापारी सामाजिक, राजकीय, वैद्यकीय , शिक्षण आदि क्षेत्रातील मान्यवरानी अभियानात सहभागी झाले.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,नगरसेवक शहबाज काझी, नगरसेवक बसवराज धरणे, जळकोट ता. तुळजापूर ग्रामपंचायतचे सरपंच अशोकराव पाटील,सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव,अझर जहागिरदार,भाजयुमो शहराध्यक्ष श्रमिक पोतदार,एम.आय. एम.चे मन्सूर शेख, पत्रकार विलास येडगे, शिवाजी नाईक, दीपक जगदाळे, तानाजी जाधव, सुनील गव्हाणे ,विशाल डुकरे,आदिसह अनेक मान्यवरानी अभियानात सहभाग नोंदवला
या स्पर्धेत प्रथम क्रमांक ॲड.धनंजय धरणे, द्वितीय डॉ. सत्यजीत डुकरे, तृतीय पत्रकार विलास येडगे या सहभागी असणाऱ्यानी स्वाक्षरी स्पर्धेत विजय मिळवला आहे. विजेत्याना मनसेच्या वर्धापन दिनी ९ मार्च रोजी गौरव करून आकर्षक भेट वस्तु,सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन जनहित कक्ष व विधि विभागाचे ॲड.मतीन बाड़ेवाले,मनसे शहराध्यक्ष अलीम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के,मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण, शहर सचिव आवेज इनामदार आदिनी केले होते.