तुळजापूर,दि.८
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात सोमवार दि.८ रोजी जागतिक महिला दिन अतिशय साधेपणाने व कोवीड १९च्या नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला.
प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर जगदे, उपप्राचार्य रवी मुदकना, प्रबंधिका सुजाता कोळी , टिपीओ प्रमुख छाया घाडगे व रासेयो प्रमुख प्रा. शामकांत डोईजोडे यांच्या हस्ते श्री तुळजाभवानी देवीच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
यानंतर महाविद्यालयातील महिला प्राध्यापिका व महिला कर्मचारी यांचा प्राचार्य ,उपप्राचार्य व विभागप्रमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यानंतर श्यामकांत डोईजोडे यांनी प्रास्ताविकेत महिला दिनाचे महत्त्व सांगितले.
यावेळी प्रा.छाया घाडगे प्रा. प्रिया सुरवसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मनोगतात आजही स्त्रियांना ज्याप्रकारे समाजात वागणूक दिली पाहिजे त्या प्रकारे दिली जात नाही याबद्दल खंत व्यक्त केली. प्राचार्य जगदे यांनी महाविद्यालयातील महिला प्राध्यापिका व कर्मचारी यांच्या कामाचे कौतुक करून घर सांभाळत शिक्षणाचे पवित्र कार्य करत असल्याबद्दल त्यांचा गौरव केला. आभार विवेक गंगणे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी रासेयो विभागांच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमात विद्यार्थी विद्यार्थिनींनी ऑनलाइन सहभाग नोंदवुन आपले मत व्यक्त केले व महाविद्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.