तुळजापुर,  दि. ६ : डाॕ. सतिश महामुनी

कराटेच्या वार्षिक परीक्षेत शहरातील ३७ विद्यार्थ्यांनी चमकदार कामगीरी केली, यशस्वी विद्यार्थ्यांची मार्गदर्शक सुधाकर ऊळेकर यांनी अभिनंदन केले. यामध्ये ७ विद्यार्थ्यांनी ब्राऊन बेल्ट, ३ विद्यार्थ्यांनी ब्ल्यु बेल्ट तर ४ विद्यार्थ्यांनी ग्रीन बेल्ट पटकावले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

   न्यु कराटे असोसिएशनच्यावतीने शहरातील सराया धर्म शाळेत मार्गदर्शक सुधाकर उळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कराटेची वार्षिक परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला असोसिएशनच्या एकूण ५० पैकी ३७ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.  परीक्षे नंतर   मार्गदर्शक सुधाकर उळेकर यांचा हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बेल्ट व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

परीक्षेचा यशस्वीतेसाठी प्रशिक्षक ज्ञानेश्वर गाडे यांनी परीश्रम घेतले. कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेऊन परीक्षा पार पडल्या.

यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे ब्राऊन बेल्ट- प्रथमेश अमृतराव, श्रेया गिड्डे, संयोगिता हाजगुडे, गणेश पवार 
ब्राऊन  बेल्ट - श्रध्दा कबीर , ब्राऊन बेल्ट - नयन भागवत, समर्थ गायकवाड , ब्ल्यु बेल्ट- द्र कदम, हृषिकेश पाठक, तन्वी खडके - ग्रीन  बेल्ट- सुरंजन क्षीरसागर, सार्थक पारधे, गिरीजा पारधे,  श्वेता खडके , ऑरेंज  बेल्ट- माऊली हाजगुडे, शिवराज पवार, आदीती धुमाळ, सई गुळवे, सुयश पवार , यलो बेल्ट  - प्रसन्न सुर्यवंशी, श्रेया पवार, वेदांत शेटे, उत्कर्ष भोसले, स्नेहल भोसले, क्षीतीज सुर्यवंशी, सिध्दी चव्हाण, वेदांत शिंदे, जान्हवी शिंदे, प्रनव क्षीरसागर, शरयू गिड्डे, सृष्टी साळुंके यांचा समावेश आहे.
 
Top