तुळजापुर, दि. ६ :

तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील एम सी व्ही सी शाखेचे प्रा.  जी. व्ही. पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. मोहन बाबरे यांनी त्यांचा सत्कार  केला.

प्रा. गोवर्धन पाटील यांच्या सत्काराच्या निमित्ताने महाविद्यालयातील सहकाऱ्यांच्या वतीने त्यांना 55 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्राचार्य  मोहन बाबरे , उपप्राचार्य रमेश नन्नवरे , डॉ.सतीश महामुनी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या , यावेळी  आभार  डॉ. शिवाजी जेटीथोर यांनी मानले. 


सर्वश्री प्रा ए जे माने, प्रा गुलाब सय्यद, प्रा. प्रवीण भाले, प्रा. आमोद जोशी, प्रा. रामलिंग थोरात, प्रा. कुमार खेदाड, प्रा अमर बोरगावकर, प्रा अमर भरगंडे, प्रा आर पी गायकवाड, प्रा .सत्यवान मुसळे, प्रा. दत्तात्रय देवगुंडे, प्रा. कुंभार  आदीची याप्रसंगी उपस्थिती होती.
 
Top