नळदुर्ग , दि.६:
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी तुळजापूर तालुक्यातील हगलूर गाव विकासासाठी दत्तक घेणार असल्याचे हगलुर या गावात आयोजित कार्यक्रमात आश्वासन दिले.
हगलूर ता. तुळजापूर येथे मकर संक्रांती निमित्त जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चना पाटील यांच्यावतीने हळदी कुंकू व महिला संवाद मेळावा घेण्यात आला. यावेळी जि.प. अध्यक्षा कांबळे या बोलत होत्या.
यावेळी महिलांशी संवाद साधताना सौ. अर्चना पाटील यांनी सांगितले की, महिलांनी स्वतः सक्षम बनवे, काळजी घेत आरोग्य जपले पाहिजे असे आवाहन केले, तसेच गावातील अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले. तसेच गावाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगितले.
यावेळी सरपंच ॲड. जयपाल पाटील यांनी हगलुर गाव दत्तक घेण्याची मागणी केली. याप्रसंगी उपसरपंच महेश गवळी, सदस्य सौ शीतल घुगे, सौ कौशल्याबाई घुगे, माजी सरपंच नालंदा पाटील, जयकुमार घुगे, औदुंबर घुगे, मनोज घुगे, दादा घुगे, मुबारक सय्यद, गणेश नागरगोजे, शिपाई दिनकर गवळी यासह गावातील नागरिक उपस्थित होते.