उस्मानाबाद ,दि.८:
उस्मानाबाद जिल्हा मानवी आरोग्य निर्देशांकात सकारात्मक वाढ करून राज्यात अव्वल स्थान प्राप्त करून दिल्याबद्दल दि.८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जि.प. अध्यक्षा अस्मिता कांबळे यांचा मदर तेरेसा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ विजयकुमार फड यांच्या प्रेरणेतून प्राथमिक शिक्षण विभागाला प्रिंटर भेट देण्यात आला.
सन2015-16 या कालावधीत राष्ट्रीय कौटुंबीक पाहणी अहवालानुसार दर एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण केवळ 821 इतके होते.
हा निर्देशांक उंचवण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सदरील गुणोत्तर सन 2019-20 मधे थेट 229 ने वाढून 1070 पर्यंत पोहचले.
सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून युद्धपातळीवर अंमलबजावणी करत डेंजर झोनमधे असलेल्या उस्मानाबाद जिल्हयाने लिंग गुणोत्तराच्या बाबतीत राज्यालाही मागे टाकले ही विशेष .
तसेच महत्वाच्या आठही मानवी आरोग्य निर्देशांकात सकारात्मक वाढ केल्याबद्दल उस्मानाबाद जिल्हा प्रशासन,आरोग्य यंत्रणेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत धनंजय पाटील कार्य कर्तृत्वाचा सादर सन्मानार्थ गौरव करण्यात आला.
याप्रसंगी मदर तेरेसा चॅरिटेबत्त ट्रस्टचे अध्यक्ष कल्याण बेताळे,
महादेवजी शिंदे सर-सचिव,
मोहन भोसले सर-संचालक,
हुंडेकरी डी.डी. सर-संचालक,
प्रशांत भोसले सर-संचालक आदी
उपस्थित होते.