तुळजापुर, दि. ८ : 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तुळजापूर महिला शहराध्यक्षपदी सौ.राजश्री देशमुख ( गंगणे ) यांची निवड एस. टी. महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे , जिल्हा अध्यक्ष सुरेश  बिराजदार, विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला जिल्हा अध्यक्षा सौ.मंजुषा मगर-माडजे यांनी केली.  

 या कार्यक्रमास युवक जिल्हा अध्यक्ष आदित्य गोरे,विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष  दुर्गेश साळुंखे,युवक शहर अध्यक्ष नितीन रोचकरी, संकर्षण देशमुख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी  पक्षाच्या महिला आघाडी मध्ये जास्तीत जास्त महिलांना सहभागी करून राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी आपण आगामी काळात वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन कामकाज करण्याचे आश्वासन या निमित्ताने नुतन शहराध्यक्ष सौ राजश्री देशमुख गंगणे यांनी दिलेले आहे.
 
Top