तुळजापूर,दि.८:
शहरातील नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 येथे जागतिक महिला दिनानिमित्त शाळेतील सर्व शिक्षिका ,सेविका यांचा सत्कार शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे विषय शिक्षक विजय देशमुख, मुख्याध्यापक बाळासाहेब जेटीथोर हे उपस्थित होते अध्यक्षस्थानी श्रीमती. एस. बी. गिराम हे होत्या.
या शाळेतील शिक्षिका एस.बी. गिराम ,संजीवनी जाधव ,सेविका बेबी गाडे ,शालन माने ,सिंधुबाई देशमुख, यांचा सत्कार करण्यात आला.
मनोगतामध्ये मुख्याध्यापक जेटीथोर बाळासाहेब , विजय देशमुख, पाटील महेंद्र ,शेटे सुरज यांनी आपले विचार व्यक्त केले.
श्रीमती एस धोनी ग्रामीण आपल्या अध्यक्षीय भाषणात एस.बी .गिराम यांनी समाजातील आजच्या महिलांचे स्थान व महिलांनी केलेली विविध क्षेत्रातील प्रगती या विषयी माहिती दिली.
प्रस्ताविक महेंद्र कावरे यांनी तर आभार रोचकरी गणेश यांनी मानले . यावेळी शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते.