तुळजापूर, दि.४ : 
 तालुक्यातील बसवंतवाडी येथील महिला पोलीस पाटील शितल भिमराव बनसोडे यांना दुसरे अपत्य मुलगीच झाली,काहींनी नावं ठेवली तर अनेकांनी अप्रत्यक्षपणे बोलही सुनावले,
"पहली बेटी, धन की पेटी" असे जरी  असला तरी त्याप्रमाणात मुलगी जन्माचे स्वागत आजही अनेक ठिकाणी होत नाही, त्यातच दोन मुली झाल्याने कुटुंबात पुन्हा नाराजगी स्पष्टपणे जाणवत असते पण सक्षम महिला पोलीस पाटलांनी आगळ्यावेगळ्या पध्दतीने संपुर्ण गावाला आवतान देऊन 
माझ्या लेकीचं बारसं आहे, अन खूप खूप आवर्जून मी सपत्नीक तुम्हाला आमंत्रण देतो आहे असा संदेश पाठवत मोठ्या आनंदाने सामाजिक विचाराची पेरणी करण्यासाठी स्त्री जन्माचे अनोखे स्वागत करत दिमाखदार बारसे घातले.


बसवंतवाडी हे गाव तसं बालाघाट डोंगर रांगाच्या पायथ्याच्या कुशीत वसलेले छोटंसं गाव,शिक्षित वर्गाच्या तुलनेत कष्टकरी मजूर अन प्रगतशील शेतकऱ्यांचे गावं म्हणून ओळखले जाते,या गावची महिला पोलीस पाटील शितल भिमराव बनसोडे या सतत आपल्या कल्पक विचारांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात, त्यातून सामाजिक संदेश देऊन नवीन विचार रुजवण्यासाठी तत्पर आहेत.

 शितल यांनी पहिल्या मुलीचे नाव अहिल्या तर दुसरीचे अनवी  ठेवले आहे.

संसारात रमण्या पेक्षा मुलीच्या भातुकलीच्या खेळात रमातो तसच काही  भावनांच्या खेळात आई नंतर मुलीचाच तर क्रम येतो, याप्रमाणे शीतल यांनी जुन्या रूढी व परंपरा याबाबत आपले मत या कौतुकास्पद बारशाच्या दिमाखदार सोहळ्यातून दोन मुली जरी झाल्या असल्या तरी स्त्री जन्माचे स्वागत करत एक आदर्शच घालून दिला. शीतल व भिमराव यांनी गावाला निमंत्रीत करून आपल्या दुसऱ्या मुलीचे बारसे थाटात साजरे केल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
 
Top