तुळजापूर, दि.४ : 

रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) च्यावतीने आनंद नगर हाडको तुळजापूर येथील बुद्ध विहार सभागृहात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि.२ मार्च १९३५ ला केलेल्या नशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाचा ८६ वा वर्धापननं दिन साजरा करण्यात आला.


 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे जिल्हा  अध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपाइं मराठवाडा विभाग उपाध्यक्ष आनंद पांडागळे, जिल्हा सरचिटणीस  तानाजी कदम आदी होते. 


  प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून तुळजापूर शहर कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. यावेळी राजाभाऊ ओव्हाळ, आनंद पांडागळे, तानाजी कदम आदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली.या कार्यक्रमाचे औचित्य साधून युवा कार्यकर्ते अमोल कदमसह शेकडो कार्यकर्त्यांनी रिपाइं मध्ये प्रवेश केला. 

यावेळी विधान सभ अध्यक्ष प्रकाश कदम ,तुळजापूर शहराध्यक्ष अरूण कदम ,तालुका सल्लागार तानाजी कदम, राजपाल कदम, प्रदिप कदम, राकेश कदम, वैजनाथ पांडागळे, अजय चौधरी, कृष्णा सगर,औदुंबर सोनवणे, बालाजी कदम, सूभम रसाळ, छोटू सोनवणे, विनोद गायकवाड , आदित्य कदम, विजय कदम, काळू कदम ,बालाजी माने आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top