जळकोट,दि.४:मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील माजी सैनिक विजय ज्ञानदेव कदम हे भारतीय लष्करात वीस वर्ष सेवा बजावली असून ते नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्याचबरोबर त्यांचे बंधू मनोज कदम हे पुण्यात यशस्वी उद्योजक म्हणून कार्यरत आहेत. भारत देशाची सेवा बजावून गावी परतल्यानंतर विजय कदम व यशस्वी उद्योजक मनोज कदम यांचा जळकोट ग्रामपंचायतच्यावतीने सत्कार करण्यात आला.


जळकोट येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात विजय व मनोज या कदम बंधूंचा सरपंच अशोकराव पाटील यांनी फेटा, शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन  सत्कार केला. यावेळी विजय कदम यांनी सेवा बजावताना आलेले अनुभव सांगितले. 

या कार्यक्रमास उपसरपंचपती बसवराज कवठे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख कृष्णात मोरे, राष्ट्रवादीचे जिल्हा सहचिटणीस महेश कदम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यशवंत कदम, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य कल्याणी साखरे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश लोखंडे, शिवराज स्वामी, पिंटू चुंगे, पिंटू कागे, सुनील माने, शिवजन्मोत्सव समितीचे ब्रह्मानंद कदम,डॉ. संजय कदम, शकील मुलाणी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर वाडीकर, पवन जाधव, वसंत सावंत, महादेव गवंडी, शरणाप्पा कामगौडा, राजेंद्र चिमुकले आदीसह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top