चिवरी , दि. ३
 ग्रामीण भागात जानेवारी महिन्यात काहीशा प्रमाणात कमी झालेला कोरोना हा पुन्हा एकदा डोके वर काढू पाहत आहे, जसे जसे कोरोनाचे रुग्ण वाढतील तसे प्रशासन पुन्हा एकदा काही कडक निर्बंध घालत आहे. 

आता काही प्रमाणात निर्बंध घालत असताना समाजातील विविध घटक, उद्योगधंदे व्यवसायांना ,शेतकरी बांधव यांना धास्ती लागली आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लाॅकडाउन  अशा अफवा पसरवून व्यापारी शेतमालाचा भाव पाडून  शेतकऱ्याचे आर्थिक नुस्कान‌ होत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे, सध्या कोरोनाची सावट पुन्हा जोर धरू लागल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गत वर्षीच्या कठीण काळात शेतकऱ्यांनी संकटाचा सामना करीत कशीबशी पिके जगवली होती. सध्या द्राक्षाचा हंगाम सुरू आहे, द्राक्षाची विक्री सुरू असताना काही व्यापारी लोक पुन्हा लॉकडाउन होण्याची अफवा पसरवत आहेत एकीकडे स्थानिक बाजारपेठत द्राक्षे उत्पादनाला मागणी चांगली असली तरी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला अपेक्षित दर मिळत नाही, द्राक्षाचा घटता दर शेतकऱ्यांसाठी आर्थिक नुस्कान करणारा ठरत आहे, त्यामुळे अनेक शेतकरी बेदाणा करण्याच्या तयारीला लागले आहेत. एकंदरीत शेतकरी अतिवृष्टी पुन्हा अवकाळीचा फटका, त्यानंतर पुन्हा कोरोना या दुष्टचक्रात शेतकरी सापडला आहे.
 
Top