नळदुर्ग , दि. ३
शहरातील मुख्यमार्ग बसस्थानक ते शास्त्री चौक हा रस्ता दुभाजक पध्दतीने करून सुशोभित करावा, शहरात ४ ते ५ दिवसा आड़ पाणी पुरवठा केला जातो, दररोज सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी ठोस पावले उचलून उपाय योजना करावे ,स्वछ भारत अभियान अंर्तगत राबविण्यात आलेल्या घर तेथे शौचालयाचा पालिकेच्या वतीने प्रोत्साहन असलेला तिसरा हप्ता तात्काळ वितरित करावा,चावड़ी चौक ते बोरीघाट (श्रीगणेश विसर्जन मिरवणूक मार्ग) हा रस्ता करावा,शहरातील विविध ठिकाणचे अंतर्गत रस्ते व गटारी यांचे कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा,आदि मागण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने दि.१५ मार्च रोजी   सकाळी अकरा वाजता नगरपालिकेच्या आवारात हलगी नाद आंदोलन करण्यात येणार आहे,


नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना मनसेच्या शिष्टमंडळाने गेली आठ दिवस भेटिची वेळ मागत होते,परंतु मुख्याधिकारी भेट घेण्यास टाळटाळ करत असल्याने व निवेदन स्विकारण्यास कोणताही अधिकारी नसल्याने आज दि . ३ मार्च  रोजी मनसेच्या पदाधिका-याकडून मुख्याधिकारी यांच्या कक्षाच्या प्रवेशद्वारावर निवेदन चिटकावण्यात आले.


यावेळी मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलीम शेख़, शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के, मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण, शहर सचिव आवेज इनामदार आदि उपस्थित होते.
 
Top