नळदुर्ग, दि. ३ :
ग्राहकांच्या वीज बिलाची दुरुस्ती करण्यासाठी नळदुर्गमध्येच वीजबील भरणा केंद्र सुरु करून ग्राहकांच्या अडचणी प्राधान्याने सोडविण्याची मागणी पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने नळदुर्ग येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता प्रविण गायकवाड यांच्याकडे लेखी निवेदनाव्दवारे करण्यात आली आहे.
शहरातील वीज ग्राहकांची मोठया प्रमाणात वीज बीले चुकीची आली असुन त्यामध्ये वाढ करुन भरमसाठ बील देण्यात आली आहेत. त्यामुळे ग्राहकांची वीज बीले दुरुस्त करुन देण्यासाठी प्रयत्न करून ग्राहकांना दिलासा दयावे. कारण लॉकडाऊन पासून शहरातील बहूसंख्य वीज ग्राहकांनी वीज बीले भरली नव्हती. त्यामुळे आता आलेली वजी बीले ही युनिट प्रमाणे न येता अंदाजे देण्यात आली आहेत, त्या मध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.
दरम्यान या सर्व वीज ग्राहकांची वीज बीले दुरुस्त करण्यासाठी कार्यालयातून प्रयत्न करावे, कोणत्याही ग्राहकांना तुळजापूरला जाण्यासाठी गरज भासू नये, त्याचबरोबर शहरात आता कोठेही वीज बील भरणा केंद्र नाही. ज्या ठिकाणी वीज बील भरले जाते, त्या ठिाकणी खासगी वीज बील भरणा केंद्रावर वीज बील भरताना मोठया प्रमाणात जास्त रक्कम द्यावी लागत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांची बीले भरताना मोठया प्रमाणात लुट होत आहे. म्हणून आपल्या कार्यालयात किंवा कार्यालयाच्या वतीने शहरात कोठे ही एक वीज बील भरणा केंद्र सुरु करुन ग्राहकांची वीज बील भरतातना होणारी लुट थांबवावी अशीही मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर भाजपचे शहराध्यक्ष पदमाकर घोडके, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, मारुती खारवे, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार शिवाजी नाईक , विलास येडगे , तानाजी जाधव, उत्तम बनजगोळे, दादासाहेब बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.