नळदुर्ग,दि. 3
पहाटे पूर्वी चारचाकी वाहनातून अनोळखी चोरटयांनी पाहरेकरी यांच्या गळ्यावर कोयता ठेवुन पेवरमशीन व पोकलेनच्या डिझेल टाकीचे लॉक तोडून तीनशे लिटर डिझेल व रोख रक्कम असे मिळून जवळपास 29 हजार रूपयेचा मुद्देमाल चोरून पसार झाल्याची घटना गुजनूर (ता. तुळजापूर) शिवारात खुदावाडी पाटीजवळ पहाटे पूर्वी घडल्याने नळदुर्ग परिारात खळबळ उडाली आहे.
रोड बनविण्याचे काम सुरू असून रोडच्या बाजूला चारचाकी वाहन चालक व तीन अनोळाखी इसमानी पिक्यूसी पेवरमशीन व हुंदाई कंपनीचे पोकलेनच्या डिझेल टाकीचे लॉक तोडून त्यामधून अंदाजे 300 लिटर डिझेल व वॉचमेनच्या खिशातील रोख रक्कम असे मिळून 28 हजार सातशे रूपये किंमतीचा मुद्देमाल मारहाण करून कोयत्याने धाक दाखवून जबरदस्तीने चोरून नेल्याप्रकरणी नळदुर्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या नळदुर्ग ते अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गाचे काम शहापूर ता. तुळजापूर शिवरात चालू आहे. स्वामी समर्थ इंजिनिअरिंग व शिंदे डेव्हेलपर या कंपनीचे रोडवर पार्क असणारे पोकलेन मशिन, रोलर, पेवरमशीन व इतर वाहने व कंपनीचे इतर साहित्य याचे रात्रपाळी दरम्यान वॉचमन म्हणून सिध्दार्थ देवीदास गाडेकर हे काम करीत आहे.
गुजनूर ता. तुळजापूर या गावाजवळ दि. 28 फेब्रुवारी रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास एक चारचाकी वाहनातुन तीन अनाळखी इसम उतरले, त्यापैकी दोघांच्या हातात कोयता होता. तिस-या इसमाच्या हातात प्लॅस्टिकचा मोकळा ड्रम होते. यावेळी वॉचमन गाडेकर याच्या गळयाला कोयता लावून गप्प बस, काही बोलू नको, आमचे काम आम्हाला करूदे असे धमकावून दुस-या इसमाने पोकलेनच्या डिझेल टाकीचे कुलूप तोडले. त्यामधील डिझेल ड्रममध्ये भरले. यावेळी विरोध केला असता तिघांनी गाडेकर यास धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर पेवरमशीन गाडीतील डिझेल काढले. असे एकुण तीन ड्रम भरून डिझेल काढून चारचाकी वाहनात ठेवले, अनोळखी इसमापैकी एकाने गाडेकर यांच्या खिशातून रोख दोन हजार रूपये काढून घेवून त्यास लाथ मारली. या घटनेबद्दल कोणालाही काही सांगू नको, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, असे धमकावून चारचाकी वाहनातूर पसार झाले.
यानंतर गाडेकर यांनी कंपनीचे मॅनेंजर महेश व्हरकटे यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी भेट देवून पाहणी केली असता अंदाजे 300 लिटर डिझेल चोरी झाल्याचे दिसून आले.
याप्रकरणी वॉचमन सिध्दार्थ देवीदास गाडेकर वय 36 वर्ष धंदा वॉचमन रा. दहिटणे ता. अक्क्लकोट जि. सोलापूर यानी नळदुर्ग पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास साहय्यक पोलिस निरिक्षक जगदीश राऊत हे करीत आहेत.