तुळजापुर, दि . ९ :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आगामी काळातील निवडणुका आणि पक्षाची वाटचाल  भक्कम होत  पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना आई तुळजाभवानी  राज सत्ता स्थापन करण्यासाठी शक्ती देवो असे साकडे तुळजापुर अध्यक्ष धर्मराज सावंत यांच्या उपस्थितीत  घालण्यात आले.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १५ व्या वर्धापन दिना निमित्त कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये मनसे तुळजापूरच्या वतीने महाआरती करून येणाऱ्या आगामी निवडणुकीत मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि त्यांच्या शिलेदारांना मोठ्या प्रमाणात यश मिळावे असा आशीर्वाद पुजारी बांधवांनी दिला.  याच विषयांनी कार्यकर्ते यांनी तुळजाभवानी देवीस साकडे घातले .यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष धर्मराज सावंत यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी प्रमोद कदम, उमेश कांबळे अक्षय साळवे, झुंबर काळदाते, अविनाश पावर, सुरज कोठावळे, विशाल माने, संतोष दूधभाते, समीर शेख, लक्ष्मण सलगर,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित  होते.
 
Top