नळदुर्ग, दि. १० :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मनसे प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शाखेच्या नामफलकाचे उद्घाटन मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच मराठी भाषा दिन व कवी कुसुमाग्रज यांच्या जन्म दिनानिमित्त आयोजित केलेल्या सुंदर मराठी स्वाक्षरी स्पर्ध्येतील प्रथम विजेते ॲड.धनंजय धरणे, द्वितीय डॉ.सत्यजित डुकरे, तृतीय जेष्ठ पत्रकार विलासजी येडगे यांना नवगिरे यांच्या हस्ते सन्मानपत्र,व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार, शहराध्यक्ष अलिम शेख, सचिव प्रमोद कुलकर्णी, उपाध्यक्ष रमेश घोडके, माजी शहराध्यक्ष शिवाजी सुरवसे,अरुण जाधव,शिरीष डुकरे आदी उपस्थित होते,
कार्यक्रमाचे आयोजन मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण, सचिव आवेज इनामदार,शहर उपाध्यक्ष निखिल येडगे यांनी केले.