तुळजापूर, दि. १८ : 
 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तुळजापूर  शहर अध्यक्षपदी प्रमोद कदम-परमेश्वर तर शहर उपाध्यक्षपदी सचिन  कदम यांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशान्वये तसेच मनसे नेते आभिजीत पानसे,आमदार राजूदादा पाटील,सरचिटणीस दिलीप धोत्रे,राज्य उपाध्यक्ष जावेदभाई शेख,जिल्हा संघटक अमरराजे कदम, जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी होणा-या नगर परिषद निवडणूकीच्या दृष्टीने हि निवड करण्यात आली आहे. 


यावेळी मनसेचे जिल्हा संघटक अमरराजे कदम, माजी जिल्हा उपाध्यक्ष हेमंत पाठक, विद्यार्थी सेना जिल्हा सचिव सुरज कोठावळे, शहराध्यक्ष धर्मराज सावंत, तालुका संघटक उमेश कांबळे, तालुका उपाध्यक्ष अक्षय साळवे, शहर उपाध्यक्ष विशाल माने, अविनाश पवार, वेदकुमार पेंदे, अमोल शिंदे हजर होते.
 
Top