नळदुर्ग दि, १८ :
उस्मानाबाद जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायती मधून ग्रामस्थांना आवश्यक त्या काम काजासाठी वारसा प्रमाणपत्र दिले जात असून यापूढे ग्रामपंचायतीमधून वारसा प्रमाणपत्र देण्यास प्रतिबंध करण्याची मागणी हगलूर ता. तुळजापूर ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये वारसा प्रमाणपत्र दिले जात आहे. कलम 372 नुसार वारसा प्रमाणपत्र देण्याचा अधिकार फक्त कोर्टाला आहे. कोणतयाही ग्रामपंचायतीना तो अधिकार नाही. कायदा नुसार कोर्टात जाऊन वारसा प्रमाणपत्र घेतले पाहीजे, तरच तो कायदेशीर ग्राहय मानला जातो . नाही तर सदरचे प्रमाणपत्र बोगस समजले जाणार असल्याचे नमूद करून वारसाची नोंद करण्यासाठी कोर्टामधुन प्रमाणपत्र घेणे आवश्यक असून उस्मानाबाद जिल्हातील सर्व ग्रामपंचायतीना वारसा प्रमाणपत्र न देण्याचा आदेश देण्याची मागणी तुळजापूर तालुक्यातील हगलूर ग्रामपंचायतीचे सरपंच ॲड जयपाल नालंद पाटील, उपसरपंच महेश सोपान गवळी यांनी लेखी निवेदनाद्वारे उस्मानाबाद जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.