नळदुर्ग,दि.१८ : 
आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नळदुर्ग शहरातील वैकुंठ रथाचा लोकार्पण सोहळा दि. 17 मार्च  रोजी सायंकाळी 5 वाजता चावडी चौक येथे पार पडला.


 यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला साहय्यक  पोलिस  निरीक्षक  जगदीश राऊत, निवृत्त शिक्षक शिवाजीराव वऱ्हाडे, नगरसेवक उदय जगदाळे, नगरसेवक शहबाज काझी, नगरसेवक महालिंग स्वामी,  पत्रकार विलास येडगे, नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या हस्ते रथाचे पूजन करून तसेच नगरसेवक दयानंद बनसोडे, नगरसेवक निरंजन राठोड, भाजप शहराध्यक्ष पद्माकर घोडके,  समाजिक कार्यकर्ते संजय जाधव, सुधीर हजारे, स्वप्नील काळे, मारुती खारवे,  जितेंद्र मोरखंडीकर, सतीश पुदाले, मानसिंग ठाकूर, अमर भाळे, उत्तम बनजगोळे, संतोष पाटील, मनसेचे  प्रमोद कुलकर्णी, गणेश मोरडे, रघुनाथ नागणे, सूरज चव्हाण यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आला. 

        
यावेळी सपोनि जगदीश राऊत, नगरसेवक शहबाज काझी, विनायक अहंकारी यांची भाषणे झाली, यावेळी बोलताना  राऊत यांनी आरंभच्या कार्याचे कौतुक करत यापुढेही असेच समाजुपयोगी कार्य करत राहावे यासाठी शुभेच्छा दिल्या व नगरसेवक शहबाज काझी आणि विनायक अहंकारी यांनी बोलताना आरंभ संस्थेने शहरापासून 3 ते 4 किलोमीटर अंतर लक्षात घेऊन अंत्ययात्रेसाठी उपयुक्त असे वैकुंठ रथ उपलब्ध करून देत शहरातील नागरिकांची सोय केली त्याबद्दल संस्थेचे आभार मानले.  यापुढेही या तरुणांच्या हस्ते असेच सामाजिक कार्य घडत रहावे यासाठी शुभेच्छा दिल्या वैकुंठ रथ उपलब्ध करून दिल्याबद्दल यावेळी संपूर्ण आरंभ टिमचे व्यापारी संघटना नळदुर्गच्या वतीने  व्यापारी खंडेशा कोरे, सुधीर पाटील, सुभाष कोरे, मुकुंद नाईक, संतोष मुळे, शंतनू डुकरे तसेच भोई समाजातर्फे सुनील उकंडे, किरण डुकरे यांनी पुष्प गुच्छ देऊन प्रोत्साहन दिले. 



या लोकार्पणा  सोहळ्सायाठी शहरातील समाजसेवक, प्रतिष्ठित नागरिक,  सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


 लोकार्पण सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष राहुल हजारे, उपाध्यक्ष विशाल डुकरे, सचिव श्रमिक पोतदार, सहसचिव अभय हजारे, कोषाध्यक्ष सागर हजारे,  सूरज आवटे,  रोहित डुकरे, हरिदास बेले, मयूर पाटील, कैलास घाटे, सुजय बिस्वास, सुमीत यादगीरे, अभिषेक आवटे, शुभम हजारे आदींनी पुढाकार  घेतले.
 
Top