तुळजापूर,दि.१७ :
केंद्र सरकारच्या अंतर्गत शिक्षण मंत्रालय ,नवी दिल्ली द्वारा चालविल्या जाणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथे शैक्षणिक सत्र २०२१ - २२ साठी होणारी नवोदय निवड चाचणी परीक्षा वर्ग सहावीसाठी दि. १० एप्रिल २०२१ रोजी घेण्यात येणार होती.
त्याऐवजी ही परीक्षा रविवार दि. १६ मे २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील वेगवेगळ्या केंद्रावर होईल. याची सर्व पालक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी असे प्राचार्य के . वाय. इंगळे यांनी सांगितले आहे.