अणदूर,दि.१२:
अणदुर ता. तुळजापूर येथील करबसपा धमुरे मित्रपरिवार यांच्या वतीने कै. चंद्रकांत आण्णा धमुरे यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त पाटील तांडा येथे दि.१३ मार्च शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबीर व सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अणदूरचे उपसरपंच डॉ. नागनाथ कुंभार यांनी केले आहे.
शनिवार दि. 13 मार्च रोजी सकाळी 9: 30 ते 12: 30 यावेळेत जि. प. प्राथमिक शाळा पाटील तांडा अणदूर येथे हे शिबीर होणार असून त्याचे उदघाटन सरपंच रामचंद्र आलूरे यांच्या हस्ते होणार आहे. तर अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य बाबुराव चव्हाण हे असणार आहेत,
सदरील शिबिरात सोलापूरचे बालरोग तज्ञ डॉ. महेश आरकाल, फिजिशियन डॉ.मुक्तेश्वर शेटे, अणदूरचे डॉ. अविनाश गायकवाड, डॉ. अमर कंदले, डॉ, जितेंद्र कानडे, डॉ, सौ रुपाली कानडे, डॉ, सौ दीपा कंदले, आदी मान्यवर डॉ मंडळी रुग्णाची तपासणी करणार आहेत, तरी या शिबिराचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन धमुरे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.