तुळजापुर, दि. १२:
तुळजापूर खुर्द येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून तुळजापूर नगर परिषदेने बांधलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शैक्षणिक सभागृहाचे लोकार्पण आमदार  राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते  दि.१२ मार्च  रोजी करण्यात आले.


आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर (खुर्द) येथील नागरिकांच्या सोयीसाठी आर. ओ. प्लांट कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले. तसेच तुळजापूर खुर्द येथील विविध विकास कामाचे कौतुक केले.
 कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रकाश मगर यांनी केले

 
कार्यक्रमास   युवा नेते  विनोद  गंगणे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सतीश दंडनाईक, नगरपालिकेचे शिक्षण सभापती  किशोर  साठे, महिला बालकल्याण उपसभापती सौ. मंजुषा  देशमाने, नगरसेवक पंडित जगदाळे, माजी नगराध्यक्ष  बापूसाहेब कणे,  उद्योजक प्रसाद देशमाने, विजय कंदले , नागेश नाईक, माऊली भोसले, माजी नगरसेवक नारायण   नन्नवरे ,  बाबुराव पुजारी ,   त्रिंबक  भोजने ,  वसंत  म्हेत्रे,   गौतम
जगदाळे ,तुळजाई मंडळाचे  अध्यक्ष आदिनाथ ठेले, तुळजाई पतससंस्थेचे चेअरमन राजाभाऊ देशमाने,  गुलचंद व्यवहारे,  प्रसाद पानपुडे  इंद्रजीत साळुंके,   श्याम भोजने ,नाना  भोजने, राम भोजन, राजु डोके तसेच तुळजाई पतसंस्थेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

 
Top