तुळजापुर, दि. ९ :

राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे तुळजापूर शहर आणि तालुक्‍यात 272 शाळेच्या शिक्षकांकडून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.  शाळेमध्ये न जाणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद घेतली गेल्याने शाळाबाह्य विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये वर्गात बसण्याचे प्रयोजन विचाराधीन असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

तुळजापूर शहरातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा या कामांमध्ये प्रयत्नशील आहेत. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूल तुळजापूर या प्रशालेतील शिक्षकांनी सोमवारी शाळेपासून वंचित असणाऱ्या मुलांचा सर्वे केला.


 पापनास गल्ली व विवेकानंद नगर तुळजापूर  या ठिकाणी शाळाबाह्य  विद्यार्थ्यांची माहिती घेण्यात आली.यासाठी  मुख्याध्यापक वागदकर एस.एच. पर्यवेक्षक काशीद, हुंडेकर  ,   श्रीमती मोकाशी एस. ए. श्रीमती मोकाशी के ए, श्रीमती अंकुशराव एस. ए.,   यांनी सर्वेक्षण केले.

सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालय तूळजापूर यांच्या शिक्षकांनी शाळाबाह्य सर्वेक्षण केले. नगर परिषद शाळा क्रमांक २ चे शिक्षक महेंद्र पाटील, रोचकरी गुरुजी, यांनी कामकाज केले.

शालाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण करताना जिजामाता कन्या माध्यमिक शाळा तुळजापूर येथील महिला शिक्षिका यांनी सर्वेक्षण केले तर लिटल प्लॉवर्स हायस्कुल च्या शिक्षकांनी दिवसभर सर्वेक्षण करून शाळाबाह्य विद्यार्थ्यांची नोंदणी केली. 

शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण करताना रामावरदायनि प्राथमिक विद्यालय तुळजापूर येथील शिक्षक यांनी सर्वेक्षण केले. शासनाच्या निर्देशाप्रमाणे तुळजापूर शहर आणि तालुक्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी शिक्षण विभागाने युद्धपातळीवर प्रयत्न चालवले आहेत. राज्य शासनाच्या सूचनेनुसार तुळजापूर तालुक्याचे समितीचे प्रमुख तहसीलदार सौदागर तांदळे आणि गट शिक्षणाधिकारी अर्जुन जाधव आणि त्यांचे विस्तार अधिकारी याकामासाठी मार्गदर्शन करीत आहेत. २७२ प्राथमिक आणि माध्यमिक प्रशाला मधील शिक्षक आपापल्या परिसरात घरोघर जाऊन शाळाबाह्य विद्यार्थ्यांची नोंदणी करीत आहेत.
 
Top