नळदुर्ग ,दि.२ : 
कोरोना काळात भुकेलेल्याना भोजन देवुन उल्लेखनीय कार्यामुळे कौतुकास पाञ ठरलेल्या आरंभ सामाजिक संस्थेने शहरवासियांची गरज ओळखुन कोणाचीही मदत न घेता वैकुंठ रथ लोकार्पन केले. 

आरंभ सामाजिक संस्थेच्यावतीने नळदुर्ग शहरात उल्लेखनीय कार्य केल्याची दखल नळदुर्ग शहर पञकार संघाने घेवुन  सर्व पदाधिका-यांचा गौरव केला आहे.

आरंभ बहुउद्देशिय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष  राहुल हजारे,श्रमिक पोतदार, भिमाशंकर बताले, आय्युब शेख, विशाल डुकरे, कैलास घाटे , सागर हजारे , मयुर , महाबोले आदिचा नळदुर्ग शहर पञकार संघाच्यावतीने शाल ,फेटा, पुष्पहार घालुन व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आले.

 या कार्यक्रमास नगरसेवक  विनायक अहंकारी, डाॕ. आंबेडकर इंग्लिश स्कुलचे संस्थापक  मारुती खारवे
सामाजिक कार्यकर्ते
संजय जाधव, जेष्ठ नागरिक रघुनाथ नागणे,  पञकार  अरुण लोखंडे,  कुस्ती पंच तथा जेष्ठ नागरिक शिवाजी व-हाडे,  नळदुर्ग शहर पञकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पञकार विलास येडगे, तानाजी जाधव,उत्तम बणजगोळे ,शिवाजी नाईक ,लतीफ शेख पक्षी मिञ आमर भाळे आदीजण उपस्थित होते. यावेळी मारुती खारवे , शिवाजी व-हाडे , तानाजी जाधव आदीनी  शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले तर आरंभचे आय्युब शेख यानी सत्काराला उत्तर देवुन पञकारानी पाठीवर कौतुकाची थाप मारल्याबद्दल यापुढेही सामाजिक कार्य जोमाने करण्याचे आश्वासन दिले.


कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुञसंचालन विनायक अहंकारी तर आभार शिवाजी नाईक यानी मानले.
 
Top