उस्मानाबाद,दि.०२: 
 रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत खराब झाला आहे. रासायनिक खता पासून पिकलेल्या अन्नपदार्थ मुळे मानवी जीवनात विविध रोगराईचा सामना करावा लागत आहे असे मत कृषी अभ्यासक, कविता गोहणे यांनी व्यक्त केले आहे.


 सेंद्रिय शेती काळाची गरज आणि विषमुक्त शेती अभियान एक चळवळ म्हणून कविता गोहणे आणि त्यांचे सहकारी बांधव उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती  करण्यासंदर्भात आवाहन करत आहेत.

उस्मानाबाद तालुक्यासह तुळजापूर येथील प्रयोगशील शेतकऱ्यांशी गोहणे यांनी संवाद साधला. 


 माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की,आज शेतातून येणारा भाजीपाला,फळे,अन्नधान्य यांना रासायनिक खताचा मात्रा दिल्याने विविध आजाराने घराघरात रुग्ण संख्या वाढलेली आहे. आगामी काळात याचा उद्रेक मोठा होईल त्यापूर्वीच प्रत्येकांनी सेंद्रिय शेती करण्यासाठी पुढाकार घ्यायची गरज आहे. याकरिता एक चळवळ म्हणून आपण शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागत आणि लागवडीची माहिती देत असल्याचे सांगितले. 

तुळजापूर उस्मानाबाद आणि इतर तालुक्यांमध्ये ही प्रगतशील शेतकऱ्यांची आगामी काळात भेट घेऊन सेंद्रिय शेती करण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे कविता गोहणे यांनी बोलताना सांगितले.
 
Top