एस.के.गायकवाड
 रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) च्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी जवळगा (मेसाई) ता.तुळजापूर येथील  कार्यकर्ते बाबासाहेब मस्के यांची निवड करण्यात आली आहे.

बाबासाहेब मस्के हे गेल्या अनेक वर्ष्यापासून भारतीय दलित पँथर ते रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ, रिपाइंचे मराठवाडा विभाग उपाध्यक्ष 
आनंद पांडागळे यांच्या सहीनीशी सदर निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले. 

यावेळी रिपाइंचे बाबा कदम,प्रताप कदम,दुर्वास बनसोडे ,बाबासाहेब बनसोडे, एस.के गायकवाड आदी उपस्थित होते. 


 
Top