नंदगाव दि.३: 
उन्हाळ्याची चाहुल लागल्याने नंदगाव ता.तुळजापूर येथे वेगवेगळ्या भागामध्ये  युवा मित्र सागर चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षासाठी  झाडावर  दहा ठिकाणी पाणपोईची सोय केली आहे. 

नंदगाव येथिल  युवा नेते वैभव पाटील , सचिन कोरे ,रहिम शेख , गणेश सुरवसे ,कलिम शेख यांच्या संकल्पनेतुन सामाजिक कार्यकर्ते सागर चौगुले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन नंदगाव गावामध्ये १० ठिकाणी पाणपोई उभारण्यात आली आहे.

येथे उन्हाळ्याच्या काळात पक्षाना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या भावनेने  ही पाणपोई उभारण्यात आली आहे.

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हे तरुण पाणपोई बसवण्यासाठी आले आसता शाळेचे शिक्षक यांनी तरुणाचे मनापासुन अभिनंदन केले .आशा प्रकारचा उपक्रम राबवुन पक्षी , प्राणी यांना उन्हाळ्याच्या दिवसात पाणी उपलब्ध करुण देण्याचा उपक्रम नंदगाव मध्ये वेगळेपण दाखवणारा आहे .अशा शब्दांत कौतुक केले.
 
Top