इटकळ, दि. १० :
तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा नळ  येथे एका २७ वर्षीय महिलेचा शुक्रवारी दुपारी  घरात एकटीला पाहुन आरोपीने विनयभंग केला. याबाबत नळदुर्ग  पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी  फरार झाला आहे. 

 राजकुमार लक्ष्मणराव शिंदे रा.मोमीन नगर मुळेगाव रोड सोलापूर  असे आरोपीचे नाव आहे.  यातील पिडीत महिलेने याबाबत इटकळ ता.तुळजापूरयेथिल दुरक्षेञ पोलीस चौकीत  फिर्यादी दिली आहे.
दुपारी १२ च्या सुमारास घरातील घर काम करीत असताना एकटीला पाहुन पाण्याचा मोटारीचे बाहना करुन राजकुमार शिंदे यांनी महिलेचा विनयभंग केला. 

याबाबत कोणाला सांगितले तर जिवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादी नुसार रात्री उशिरा नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेनंतर  आरोपी फरार झाला असुन अधिक तपास जमादार  विलास जाधव हे करीत आहेत. 
 
Top