तुळजापुर, दि. ९ :
राष्ट्रीय महामार्ग क्र ३६१ रत्नागिरी - नागपूर तुळजापुर खुर्द येथून लातुर कडे जाणारा बाह्य मार्ग रस्त्याच्या कामाचा शुभारंभ महंत वाकोजी बुवा,नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नगरसेवक विशाल रोचकरी, विजय कंदले,राजा देशमाने,हायवे डी बी एल अधिकारी सत्यरंजन राऊत यांच्या उपस्थित सदरील कामाचा शुभारंभ करण्यात आला.
सदरील रखडलेल्या कामाबाबत बर्याचशा तक्रारी होत्या. यामध्ये अपघाताचेही प्रमाण वाढलेले होते. परंतु मागील आठवड्यामध्ये आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सदरील कामाची पहाणी केली.
सदरील कामास झालेला विलंब आणि शासन निर्देशाप्रमाणे पूर्ण काम करण्याच्या सूचना याप्रसंगी त्यांनी दिल्या.
नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी सदरिल कामा बाबतची तक्रार केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांना पत्राद्वारे केली. या कामाच्या अनुषंगाने जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि समाजसेवक पंकज शहाणे यांनीही अपूर्ण कामामुळे होत असलेली अपघात आणि तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी केली होती.