नळदुर्ग, दि. ९ :
संसर्गजन्य कोरोनामुळे सर्वांची अडचण झाली असून लॉकडॉउन टाळायाचे असेल तर नागरिकांनी कसलीही भिती न बाळगता लसीकरण करून घ्यावे असे सांगून सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी नागरिकांत लसीकरणाबाबत जनजागृती करण्याचे अवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज पाटील यांनी नळदुर्ग येथे केले.
काँग्रेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष स्वर्गीय संजय दळवी यांच्या स्मरणार्थ सुरवसे व दळवी परिवाराच्यावतीने नळदुर्ग शहरात पाणपोईचा शुभारंभ शुक्रवार दि. 9 एप्रिल रोजी काँग्रेसचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष ॲङ धिरज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पाटील हे बोलत होते. याप्रसंगी उपस्थित पत्रकारांना मास्कचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास नगरसेवक उदय जगदाळे , निरंजन राठोड, विनायक अंहकारी, शहबाज काझी, बसवराज धरणे, नितीन कासार, ॲड.अरविंद बेडगे, भाजपा शराध्यक्ष पद्माकर घोडके, भाजयुमोचे श्रमिक पोतदार , सागर हजारे,, गणेश मोरडे, पञकार विलास येडगे ,शिवाजी नाईक ,तानाजी जाधव,लतीफ शेख, अमर भाळे, सुधीर हजारे, आय्युब शेख , उत्तम बणजगोळे , काझी , सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे, नवल जाधव, सुनिल गव्हाणे, ज्ञानेश्वर घोडके,अझर जहागिरदार ,बंडू पुदाले, आप्पु स्वामी, शिवाजी गायकवाड ,समिर सुरवसे, संदीप सुरवसे, पप्पू पाटील, आदीजण उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाभिक समाजाचे संदीप सुरवसे, नितीन दळवी, संतोष महाबोले, महादेव माने, अभिषेक सुरवसे, सुशिल सुरवसे, सुजित सुरवसे, विशाल सुरवसे आदींनी पुढाकार घेतले.कार्यक्रमाचे प्रास्तावीक व सुञसंचालन विनायक अहंकारी यानी केले.