तुळजापुर, दि. ११ :
तुळजापूर शहरामध्ये दीड हजार कुटुंबांना आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मास्क वितरण करण्यात आले असुन लसीकरणाबाबत लोकांमध्ये गैरसमज असल्यामुळे जनजागृती करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सागर कदम व त्यांच्या सहकार्यानी विशेष उपक्रम हाती घेतले आहे.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३o व्या जयंती निमीत्ताने शहरातील भिमनगर, आराधवाडी, सिद्धार्थनगर,नागझरी परिसरातील नागरीकांना येथिल सागर कदम यांनी घरोघरी जाऊन ११३० कापडी मास्कचे वाटप केले.
यावेळी मास्क वापरणे, लसीकरणाचे महत्व तसेच कोरोनापासून बचाव उपाययोजना इत्यादी महत्त्व पटवून देवून जनजागृती केली.
यावेळी सुशिल कदम, चेतन कदम, सुदर्शन कदम, रोहीत पांडागळे,अक्षय कदम, आदित्य कदम, अनिकेत कदम, हर्षदीप सोनवणे, दिपक सोनवणे आदि उपस्थीत होते.
गेल्या दोन वर्षापासून आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने सागर कदम आणि त्यांचे सहकारी यांच्या वतीने कोरोना संसर्गजन्य परिस्थितीमध्ये मास्क वितरण करण्याचा उपक्रम चालू आहे. सागर कदम यांनी हे दोन्ही उपक्रम हाती घेतल्यामुळे या परिसरातील लोकांमध्ये जनजागृती होऊन वयस्कर आणि तरुण लस घेण्यासाठी प्रवृत्त झाले आहेत.