तुळजापुर, दि. ११ :
तुळजापूर शहरामध्ये शनिवार, रविवार या दोन दिवशी जनता कर्फ्यु पार पडला. या निमित्ताने नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
शनिवार आणि रविवार दोन दिवस तुळजापूर शहर आणि तालुक्यांमध्ये कडेकोट बंदला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या काळात सर्व दुकाने आणि गर्दीची ठिकाणं बंद होती. केवळ राज्य परिवहन महामंडळाची वाहतूक व खासगी लोकांच्या चार चाकी आणि दुचाकी गाड्या तुरळक प्रमाणात रस्त्यावर धावत असताना दिसून आले. या काळात बाहेर जाऊन येणाऱ्या भाविकांची संख्या देखील अत्यल्प होती.
तुळजापूर नगरपरिषदेचे कर्मचारी शहराच्या प्रमुख ठिकाणी तैनात करण्यात आल्यामुळे सर्वत्र शांततेचे वातावरण होते.
यादरम्यान तुळजापूर शहराला केंद्रीय पथकाची भेट होणार असल्यामुळे या भेटीच्या अनुषंगाने शासनाने सर्वतोपरी तयारीत केल्याचे चित्र दिसून आले. महसूल प्रशासन आणि नगरपरिषद प्रशासन यांच्यासह आरोग्य विभागाने केंद्रीय पथकाला माहिती देण्यासाठी आणि येथील उपायोजना दाखवण्यासाठी तयारी केली होती.