अणदूर,दि.११ :
 तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथे जेष्ठ समाजसेवक डॉ सिद्रामप्पा खजूरे यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त पत्रकार दयानंद काळुंके यांनी संपादित केलेल्या कर्मयोगी पुस्तकाचे प्रकाशन ग्रामस्थांच्या वतीने खुदावाडी येथील मारुती मंदिरात करण्यात आले.

डॉ सिद्रामप्पा खजूरे यांनी प्रसिद्धीच्या मागे न लागता सामाजिक जाणिवेतून वैद्यकीय सेवेतून गोरगरीबांना आधार दिला तर खुदावाडी येथे ग्राम स्वच्छता अभियानात सहभागी होऊन गावाला महाराष्ट्रात नावलौकिक मिळवुन दिले.

कोरोनाच्या महामारीत अनेक उपेक्षित वंचित निराधार समाजांना राशन व आरोग्य सेवा देऊन आधार दिला,व सांगली, सातारा जिल्ह्यात पूरग्रस्तांना भरीव मदत केल्याने त्यांचे कार्य अलौकिक आहे. त्यामुळे डॉ सिद्रामप्पा खजूरे यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त"कर्मयोगी" पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी गावचे उपसरपंच पांडुरंग बोंगरगे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी जवळगे,माजी केंद्र प्रमुख दगडू सालेगावे,माजी पं. स. सदस्य महादेव सालगे, मनोहर घोडके, चन्नाप्पा सालगे मुख्याध्यापक प्रकाश राठोड, वसंत कबाडे, चेअरमन तुकाराम बोंगरगे, शेकाप्पा सालगे, नागनाथ जत्ते, अनंत अहंकारी, यांच्यासह ग्रामस्थ  उपस्थित होते.
 
Top