तुळजापूर,दि.४ : 
तुळजापूर-लातूर बायपास रस्त्यावर अपघातांचे केंद्र बिंदु  ठरत असलेल्या चौकाची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पाहणी करून चारही बाजुंनी तात्काळ गतिरोधक तसेच इतरही उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तसेच केलेल्या कामांचा अहवाल तात्काळ सादर करण्यास सांगितले.

तुळजापूर येथिल हा चौक वर्दळीचा असल्यामुळे येथे उड्डाण पुलाची नितांत गरज आहे. पण तोही बांधला जात नाही.  जो रस्ता बांधण्यात  येत आहे.  त्याचेही काम पूर्ण झालेले नाही. तरीही महामार्ग प्रशासन या रस्त्यावर टोल कशासाठी घेत असेल असा सवाल आमदार यांनी उपस्थित  केला. 

प्रशासनाच्या  दिरंगाईमुळे कितीतरी जणांना कायमचे अपंगत्व आले आहे, कितीतरी जणांना जीव गमवावा लागला आहे. या ठिकाणी काल तिहेरी अपघात झाला. यामुळे संबंधित अधिकारी व रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर दिलीप बिल्डकॉनचे अधिकारी यांना सोबत घेऊन तात्काळ या जागेची पाहणी केली व आपण केलेल्या सुचनेनुसार कामही सुरू झाले आहे.

काल झालेल्या अपघातग्रस्त कुटुंबातील नातेवाईक देखील घटनास्थळी उपस्थित होते. त्यांचीही आस्थेवाईकपणे चौकशी केली. 

अपघातातील जखमींना उपचारासाठी मदत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे पाटील म्हणाले . याठिकाणी आजवर झालेल्या अपघातांतील जीवित हानीची व इतर नुकसानीचीही जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या देखील सक्त सूचना आमदार पाटील केल्या. 
 
याप्रसंगी तुळजापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  मनोजकुमार राठोड, प्रोजेक्ट मॅनेजर  सत्यरंजन राऊत, अॕथॉरिटी इंजीनियर व्ही. व्ही. कुलकर्णी, जूनियर इंजीनियर आनंद पुएद, महामार्ग पोलिस निरीक्षक  पात्रे, आदी उपस्थित होते.
 
Top