तुळजापूर,दि.४ : 
महादेवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी केदारनाथ हे उत्तराखंड मधील एक महत्वाचे ज्योतिर्लिंग आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेले हे देवस्थान जगभरात प्रसिद्ध आहे. या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती शंभू महादेव देवस्थान, पिंपळा (खुर्द) ता. तुळजापूर येथे साकारली जात आहे. 

लोकसहभागातून तब्बल ३ कोटी रुपये जमा करून ५५ फूट उंचीचे हे भव्य मंदिर बांधण्यात येत आहे. या अभिनव उपक्रमास तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भेट दिली.

यावेळी ग्रामस्थांसोबत झालेल्या बैठकीत गावातील विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात  आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सुशोभीकरण करणे, गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरीवरील डीपीसाठी सिंगल फेजची व्यवस्था करणे, अंतर्गत रस्ते व गावातील प्रवेशद्वारा समोर ड्रेनेजची व्यवस्था करण्याबाबत मागणी करण्यात आली. 

सदरील मागण्या तात्काळ मान्य करून ही कामे मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आमदार पाटील यांनी सूचना दिल्या.

याप्रसंगी भाजपाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष  संतोष बोबडे,   जिल्हा सरचिटणीस वसंत वडगावे,  यशवंत लोंढे,   कृष्णार्थ कदम,  गणेश कदम,  दत्ता कदम,   विष्णू शिंदे,  संजय कदम,   धनाजी कदम,  महादेव माळी,   सुभाष पाटील,  तानाजी कदम,   गणेश रोकडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top