संग्रहीत छायाचिञ 

 उस्मानाबाद,दि.३ : 
इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे   बांधकाम कामगारांची नोंदणी केली जाते, या नोंदणीत कामगारांना वेगवेगळ्या सुमारे 32 योजनेचा लाभ दिला जातो, या योजनेच्या लाभावर डोळा ठेवून नोंदणीतील अटी व नियमातील पळवाटांचा आधार घेत येथील अधिकारी व दलालाकडून कामगाराची मोठी आर्थिक लूट होत असल्याचे दिसून येत आहे.

  नोंदणी करण्यासाठी कामगाराकडून दलाल हजार ते दोन हजार रुपयांचा भुर्दंड लावत आहेत, त्यामुळे अनेक कामगारबाह्य  नागरिकाच्या    समावेशामुळे खरे  लाभार्थी     लाभापासून वंचित राहिल्याचे तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये दिसत आहे. कामगार मंडळाचे नियम धाब्यावर बसवुन हे  दलाल नागरिकाच्या नोंदी करत आहेत. अशा होणाऱ्या बोगस कामगारी खातेनिहाय चौकशी करून त्यांची नोंदणी रद्द व दलालांकडून होणारी आर्थिक लूट थांबवण्याची मागणी तालुक्यातील सुजाण नागरीकातून होत आहे.

 
Top