वागदरी,दि.३ एस.के.गायकवाड रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले)उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी नळदुर्ग  येथील  कार्यकर्ते बाबासाहेब बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे.


बाबासाहेब बनसोडे  यानी सलग २० वर्षे नळदुर्ग शहराध्यक्ष तर ३ वर्षे तुळजापूर तालुका अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. त्यांच्या कामाची दखल घेऊन रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ, रिपाइंचे मराठवाडा विभाग उपाध्यक्ष 
आनंद पांडागळे यांच्या स्वाक्षरीने  निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले. 
त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र आभिनंदन होत आहे.
 
Top