नळदुर्ग,दि.३ : विलास येडगे
 पानटपरी व चहा व्यवसाय बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी तात्काळ रद्द करून या छोट्या व्यावसायिकांची उपासमार टाळावी अशी मागणी नळदुर्ग  शहर भाजयुमोचे अध्यक्ष श्रमिक पोतदार यांनी केली आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या झपाट्याने वाढत चाललेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  जिल्हाधिकारी यांनी गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील पानटपऱ्या तसेच चहाची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यातील पानटपऱ्या व चहाची दुकाने बंद केली आहेत. 


त्यामुळे या छोट्या व्यावसायिकांचे सध्या प्रचंड हाल होत आहेत. हातावर पोट असणाऱ्या या व्यावसायिकांच्या कुटुंबियांची सध्या उपासमार होत आहे. नळदुर्ग शहरात शंभर पेक्षा जास्त पानटपऱ्या व चहाची दुकाने आहेत. जिल्हाधिकारी यांच्या या आदेशामुळे सध्या शहरातील पानटपऱ्या व चहाची दुकाने बंद करण्यात आली आहेत, असेही श्रमिक पोतदार यांनी म्हटले आहे. 

वास्तविक पाहता इतर सर्व व्यवहार सुरू असताना फक्त पान टपऱ्या आणि चहाची दुकानेच बंद करण्याचा निर्णय का घेण्यात आला? असा प्रश्न श्रमिक पोतदार यांनी उपस्थित केला आहे. या छोट्या व्यावसायिकांचा उदरनिर्वाह या व्यवसायावरच असतो. यांचे पोट या व्यवसायावर अवलंबुन आहे. वास्तविक पाहता इतर व्यवसायप्रमाणे पानटपऱ्या व चहाची दुकाने कोरोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करून सुरू ठेवण्यास कांहीच हरकत नसल्याचे श्रमिक पोतदार यांनी म्हटले आहे. पानटपऱ्या व चहाच्या दुकानावर कडक निर्बंध घालुन हा व्यवसाय पुर्णपणे बंद न करता सुरू ठेवणे गरजेचे आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देत पानटपऱ्या व चहाची दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी श्रमिक पोतदार यांनी केली आहे.
 
Top