तुळजापूर, दि. २४ :
तुळजापूर शहरात एकूण १० प्रभागात टीम कार्यान्वित करून संपूर्ण शहरातील नागरिकांची ऑक्सीमीटर व थर्मामीटर द्वारे तपासणी करून त्यांच्याकडून विविध रोगांची माहिती तसेच कोव्हीड-19 चे अनुषंगाने, शासनाचे आदेश त्यासंदर्भात घ्यायची काळजी याबाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात येत आहे
या उपक्रमास प्रभाग क्रमांक ४ मधील सर्व नागरिक उदंड प्रतिसाद देत आहेत. नगराध्यक्ष सचिन रोचकरी, मुख्याधिकारी आशिष लोकरे प्रत्येक प्रभागात प्रभागातील टीमला भेट देऊन वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करीत आहेत , तसेच नागरिकांनी सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असेही आवाहन करीत आहेत.
या कामी प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक सुनील रोचकरी, अपर्णा नाईक, आशा विनोद पलंगे, माजी नगरसेवक विनोद पलंगे, युवा नेते , नागेश नाईक यांचे वेळो वेळी सहकार्य लाभत आहे.
प्रभाग प्रभाग क्रमांक ४ च्या टिम मध्ये अभंगराव गायकवाड पथक प्रमुख ,अशोक शेंडगे ,महेंद्र कावरे, बापूसाहेब रोचकरी,सुनील वाघमारे हे काम पाहत आहेत.