तुळजापूर, दि.२४ :
तुळजापूर शहरात एकूण १० प्रभागात टीम कार्यान्वित करून संपूर्ण शहरातील नागरिकांची ऑक्सीमीटर व थर्मामीटर द्वारे तपासणी करून त्यांच्याकडून विविध आजाराची माहिती तसेच कोविड-19 च्या अनुषंगाने, शासनाचे आदेश त्यासंदर्भात घ्यायची काळजी याबाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात येत असुन त्यास नागरिकातुन उत्सर्फुत प्रतिसाद मिळत आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नगराध्यक्ष सचिन रोचकरी, मुख्याधिकारी आशिष लोकरे यांच्या नियोजनानुसार तुळजापूर शहरात
माझे कुटुंब माझी जबाबदारी या आरोग्य तपासणी मोहिम सुरु करण्यात आली. या उपक्रमास शहरातील नागरिक प्रतिसाद देत आहेत.
याकामी नगरसेवक अमर मगर व विशाल रोचकरी यांचे वेळोवेळी सहकार्य लाभत आहे.पथक प्रमुख वैभव कुमार अंधारे,महेंद्र पाटील, पथकामध्ये गणेश रोचकरी,नागेश काळे,जयजयराम माने, सुभाष राठोड, लखन कंदले,सुभाष चव्हाण आदीं परिश्रम घेत जनजागृती करत आहेत.