तुळजापूर , दि.२५ :
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री . तुळजाभवानी मातेच्या चरणी आंब्याची आरास करुन विशेष पुजा रविवार दि.२५ एप्रिल रोजी करण्यात आली.
मातेच्या चरणी देवीचे भोपे पुजारी धनंजय पाटील यांनी आपल्या शेतात सेंद्रीय पध्दतीने फुलविलेल्या आंब्याच्या आमराईतील आंबे सर्व प्रथम देवीच्या चरणी अर्पण केले.
कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली कु. श्रृती धनंजय कदम पाटील (बीएसी ॲग्री रत्नाई काॅलेज अकलूज) यांच्या देखरेखीखाली आंब्याचे १६ टन उत्पन्न झाले आहे. विशेष बाब म्हणजे संपूर्ण आंबा एक्सपोर्ट क्वालिटीचा असून तो यावर्षी संपूर्ण आंबा मुंबईच्या व्यापाऱ्यामार्फत इंग्लंडला एक्सपोर्ट करण्यात आला आहे.
आज आई जगदंबा माते समोर आंब्याची आरास ही स्पेशल पुजा केलेली आहे. विशेष बाब म्हणजे धनंजय पाटील हे दरवर्षी न चुकता आंबे देवीच्या चरणी अर्पण करतात. आपल्या शेतातील पहिले आलेले फळ हे देवीला अर्पण करण्यात येते. ही तुळजापूरातील परंपरा आहे.
पूजेच्या वेळी देवीचे मुख्य भोपे पुजारी विश्वजित (कदम) पाटील हे ही उपस्थित होते.