नंदगाव, दि. २५ : वैभव पाटील
हरि ओम मसालेवाले पुणे व नंदगाव ता. तुळजापूर या गावचे सुपुत्र शिवपुत्र कलबुर्गी यांच्यावतीने तब्बल ७२ हजार रुपये किंमतीचे रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे २ हजार ५०० आयुर्वेदीक काढा पॉकीट नंदगाव ग्रामस्थानां व कोरोना महामारीत जीव धोक्यात घालुन काम करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचारी, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत कर्मचारी आदींना वाटप करण्यात आले.
गेल्या वर्षी कोरोना महामारीच्या काळात तुळजापूर तालुक्यातील नंदगाव ग्रामपंचायत कार्यालयास ११ हजार रूपये कलबुर्गी यांनी देणगी दिली. त्यातून संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्यात आले.
या वर्षी ७२ हजार रूपये किमतीचे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे २ हजार ५०० आयुर्वेदीयक काढा पाकिट रविवार दि. 25 एप्रिल रोजी जि.प. प्राथमिक शाळेत सरपंचपती श्रध्दानंद कलशेट्टी, सामाजिक कार्यकर्ते वैभव पाटील, अर्जुन जमादार, आप्पा गब्बुरे, ईरण्णा वाले, संभाजी वाघमारे, आशा कार्यकर्ती आदींच्या उपस्थितीत हरि ओमचे मालक शिवपुत्र कलबुर्गी यांनी लाईव्ह व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे औपचारिक उद्घाटन केले.
यावेळी कलबुर्गी म्हणाले की, मी खुप हालाखीच्या परिस्थितीतुन आलोय.माझी वडिलोपार्जीत परिस्थिती नसताना मी घंटे गुरूजी व भिमण्णा जमादार यांच्यासह गावचे मदत झाले होते.हे मी कधीच विसरू शकत नाही. मी कितीही मोठ झालो तरी गावक-यांचे अशिर्वाद माझ्या पाठीशी आहे.याचेच रूण म्हणून मी सामाजिक जाणीवेचे भान ठेऊन परोपकारी भावनेने मी माझ्या गावचे फुल नाही फुलाचे पाकळी म्हणून मदत केली आहे.
त्याचबरोबर आशाताई जयश्री सातलगावकर, जयश्री खजुरे, लक्ष्मी कोरे, ललीता कोळी, सुरेखा निगुडगे , यांनी ही खारिचे वाटा म्हणून प्रत्येक घरोघरी जाऊन काढा वाटप केल्याचे सांगितले. या सर्वांचे बहुमोल कार्याचे मनापासून आभार मानले.त्याच बरोबर गावचे सरपंचपती कलशेट्टी यांनी देखील त्यांच्या कार्याचे दखल घेत त्यांचे गुणगौरव केले.