नळदुर्ग,दि.२५:
जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार मौजे-गुळहळ्ळी ता. तुळजापूर येथे शनिवारव रविवार रोजी जनता कर्फ्यू कडकडीत पाळण्यात आला. यावेळी ग्रामस्थातुन उत्सर्फुत प्रतिसाद मिळाला आहे.
तुळजापूर तालुक्यातील गळहळ्ळी येथे जनता कर्फ्यूच्या दरम्यान गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आलेहोते. कोरोनाचा संसर्ग गावात पसरू नये यासाठी गावातील सर्व ग्रामस्थांना घरीच राहून स्वतःची, कुटुंबांची व गावाची काळजी घ्यावी असे आवाहन सरपंच सौ मिरा सचिन घोडके व ग्रामसेवक एम. सि. निलगार यांनी केले होते. त्यावरुन ग्रामस्थांनी सहकार्य करुन कडकडीत बंद पाळला. सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने व प्रशासकीय यंत्रणामुळे सुदैवाने कोराना या रोगाने नुकसान झाले नाही गुळहळ्ळी हे गाव मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर असल्याने ग्रामस्थांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
त्यामुळे वेळोवेळी प्रशासनाने दिलेले निर्बंध आम्ही ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व पदाधिकारी, प्रशाकीय अधिकारी व ग्रामस्थानी पालन केल्याचे सरपंच सौ. मिरा घोडके यांनी सांगितले .