तुळजापूर , दि. २५ : 

उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री , खासदार आणि चार आमदार कोरोना आपत्तीमध्ये रुग्णांना मदत करण्याऐवजी दिखावा करित असल्यामुळे रुग्णांना  त्रास सहन करावा लागत आसल्याचा आरोप मनसेने केला आहे.

या नेत्यांची संपर्क कार्यालय चालू आहेत की बंद अशी परिस्थिती जिल्ह्यात आहे. याप्रकरणी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी जिल्हा संघटक अमर कदम यांनी पत्रक प्रसिद्ध केले.


  पालकमंत्री यांनी दर आठवड्याला परिस्थितीचा आढावा घेऊन महत्त्वाचे निर्णय घेतले पाहिजेत, जिल्ह्याचे खासदार आणि सर्व आमदार यांनी आपापल्या मतदार संघामध्ये करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि लोकांची गरज याचा मेळ घालून जनतेला सहकार्य करण्याची भूमिका ठेवली पाहिजे. मात्र असे न करता ही मंडळी केवळ दिखावा करून गायब होत असल्यामुळे जनतेला ञास सहन करावा लागत आहे. सामान्य माणसाच्या प्रश्नाला लक्ष देण्यासाठी या लोकप्रतिनिधींचे जनसंपर्क कार्यालय देखील कार्यान्वित नसल्याचे चित्र आहे. ही परिस्थिती बदलून तात्काळ जनतेच्या मदतीसाठी लोकात यावे असे आवाहन जिल्हा संघटक अमर कदम यांनी केले आहे.
 
Top