काटी, दि.२५ : 

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील सदाशिव दत्तु गिरी वय ५२  वर्ष  यांचे शनिवार दि. २४  रोजी कोरोनामुळे सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान  निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, तीन भाऊ, भावजय, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.


ते बरीच तामलवाडी ता. तुळजापूर  येथील बालाजी अमाईन्स मध्ये  नोकरी करीत होते.  नोकरी निमित्त दुबईला गेले होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ते मागील वर्षी भारतात आले होते. पुणे येथे स्वत:चे घर घेऊन कुटुंबासह राहत होते. पुण्याहून येऊन काटीतील शेती व्यवसाय सांभाळत होते. 

त्यांच्या  निधनाबद्दल सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

 
 
Top