तुळजापूर,दि.२४ :
राहत्या घराचे कुलुप तोडुन अज्ञात चोरट्याने घरातील साहित्यासह रोख रक्कम असे मिळुन सुमारे ६० हजार रुपयाचे ऐवज चोरुन नेल्याची घटना तुळजापूर येथे घडली.
विजयालक्ष्मी संजय क्षिरसागर, रा. आरळी (बु.), ता. तुळजापूर यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने 21- 22 रोजी दरम्यान तोडून घरातील एलईडी टीव्ही, ओव्हन, साड्या व रोख रक्कम असा एकुण ६० हजार रुपयेचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या विजयालक्ष्मी क्षिरसागर यांनी 23 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
क्षिरसागर हे अरळीचे आहेत, परंतु तुळजापूर येथे पुजारी नगरमधील कॉलनीत राहतात, याठिकाणी चोरी झाल्याची माहिती पञकार उमाजी गायकवाड यानी दिली.