उस्मानाबाद, दि.२६ 
जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथे उभारण्यात आलेला हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री ना. शंकरराव गडाख-पाटील  यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यान्वित करण्यात आला. 


या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन ६० सिलेंडर असून जिल्हा रुग्णालयात लागणाऱ्या एकूण ऑक्सिजन पैकी १० टक्के ऑक्सिजन या प्रकल्पाच्या माध्यमातून पुरविला जाणार आहे. 
लिक्विड ऑक्सिजनचा १० के.एल. क्षमतेचा प्रकल्प यापूर्वीच कार्यान्वित केला असून आज हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प ही कार्यान्वित करण्यात आला. या दोन्ही प्रकल्पामुळे शासकिय  रुग्णालयातील ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यास मदत होणार आहे.


याप्रसंगी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधीक्षक राजतीलक रोशन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील आदी उपस्थित होते.
 
Top